March 31, 2023 Friday

The Voice Of Kokan

Home » Tourism » कोकण किनारी व्हेल माशाची ‘उलटी’ सापडण्याचं प्रमाण का वाढलं..?
a
Why the number of whales found on the Konkan coast has increased

कोकण किनारी व्हेल माशाची ‘उलटी’ सापडण्याचं प्रमाण का वाढलं..?

रत्नागिरी : आवडते खाद्य माकुळ मासा खाण्यासाठी कोकण किनारपट्टीवर व्हेल माशांचा वावर वाढला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधीची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रेस) सापडत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

व्हेल माशांच्या एका किलो वजनाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १ कोटी रुपये किंमत मिळते. कोकण किनारपट्टी भागात सध्या व्हेलच्या उलटीच्या विक्रीचे प्रकार एकामागोमाग एक पुढे येत आहेत. रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये उलटी विक्रीचे प्रकार उघड झाले आहेत. मागील आठवड्यात चिपळूणमध्ये सलग एकाच दिवशी दोन ठिकाणी उलटी विक्रीसाठी आणणाऱ्यांना अटक करण्यात आली.

गेल्या वर्षभरात कोकणातील जिल्ह्यात व्हेलची उलटी सापडू लागली आहे. पूर्वी येथील मच्छीमारांना याची माहिती होती; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढते महत्त्व लक्षात आल्याने हे प्रकार पुढे येऊ लागले आहेत. गेल्या पाच वर्षात कोकण किनारपट्टीवर व्हेलचा वावर वाढलेला असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. कवच असलेले मासे हे व्हेलचे खाद्य आहे. त्यात माकुळ, कोळंबी, जेलीफिशचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात माकुळ सापडत आहे.

प्रचंड प्रमाणात मिळणारे माकुळ खाण्यासाठीच व्हेलही कोकण किनारपट्टीकडे वळल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. व्हेल मासा दीड ते दोन टन वजनाचा असून तो एकाच वेळी शंभर ते दोनशे माकुळ खातो. माकुळच्या कवचधारी भागाचे पचन होत नाही. तो माशाच्या पोटात साठून राहतो. हा भाग उलटीच्या रूपाने बाहेर पडतो. ही उलटी पाण्यावर तरगंत एकत्र होते आणि तिचा लगदा तयार होतो. प्रवाहांबरोबर हा लगदा समुद्रकिनारी येतो. किनाऱ्यायावरील व्हेल माशांचा प्रमाणात वाढ असल्याने उलटी सापडण्याच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

तयार होण्यासाठीचा कालावधी किती?उलटी तयार होण्यासाठीचा कालावधी किती लागतो, हे सांगणे अभ्यासकांनाही शक्य झालेले नाही. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मादामास्कर, मालदीव, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, बहामासारख्या देशांमध्ये वापर होतो. ही उलटी ओळखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयोगशाळा आहे. स्थानिक पातळीवर तापवलेल्या सुईच्या वापरातून उलटी तपासली जाते. सुई गोळ्यात टाकली की धूर येतो आणि तो भाग काळा होतो. त्याला एक मंद सुगंधित वास येतो.”माकुळ हे व्हेल माशांचे प्रमुख खाद्य आहे. म्हाकुळ कवचधारी असल्याने त्याचे अपचन होते आणि उलटी होते. त्याचा उपयोग सुगंधित अत्तराबरोबरच औषधामध्येही केला जातो.”- डॉ. स्वप्नजा मोहिते, अभ्यासक

Share this Post ( शेअर करा )
KOKAN TIMES

KOKAN TIMES

कोंकणातील सगळ्यात मोठ डिजिटल बातमीपत्र | कोकणी माणसाचं हक्काचं न्यूज चॅनेल.

KOKAN TIMES

KOKAN TIMES

कोंकणातील सगळ्यात मोठ डिजिटल बातमीपत्र | कोकणी माणसाचं हक्काचं न्यूज चॅनेल.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

Categories

RECENT POST

Newsletter Signup Form
error: Content is protected !!
Scroll to Top