March 29, 2023 Wednesday

The Voice Of Kokan

Economy

A big decision of the state government regarding these six projects in Kokan

कोकणातील या सहा प्रकल्पांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. कोकण : कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. तसा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोकण विभागातील सहा प्रकल्पांमधील यापूर्वीचे निविदा विखंडनाचे आदेश रद्द करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

ST staff closed for second day in a row

सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचारीचे काम बंद

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे एकही फेरी सुटू शकली नाही. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे, असा अध्यादेश आला पाहिजे, याकरिता कर्मचारी अडून बसले आहेत.

Kokan will get a good road soon

कोकणला मिळणार लवकरच चांगला रस्ता

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर माझे वैयक्तिक लक्ष आहे. मी कोकणला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार. साहेबांना सांगा, हा विषय मी लवकरच संपवतोय, असा निरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाद्वारे राज ठाकरे यांना दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ११ वर्षे रखडले आहे. महामार्गाच्या या गोंधळाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी याबाबत रान उठवले होते.

error: Content is protected !!
Scroll to Top